इतिहास म्हणजे काय? :
आज आपण ज्या काळात राहतो तो वर्तमान काळ. त्या पूर्वी होऊन गेलेला काळ म्हणजे भूतकाळ. भूतकाळात घडलेल्या विविध घटना इतिहासात सांगितल्या जातात. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात.
भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. मानव पृथ्वीवर लाखो वर्षापासून राहत आहे. या काळात मानवाने चिकाटीने प्रयत्न करून प्रगती केली. हा त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्यासाठी मानवी समाजाला खूप प्रयत्न करावे लागले याची माहिती इतिहासामुळे कळते.
इतिहासाची आवश्यकता : मानवाने त्याच्या आसपासच्या परिसरातील साधनसंपत्तीचा उपयोग करून अन्न वस्त्र व निवारा मिळवला. निसर्गाच्या सहाय्याने मानवाचे जीवन सुखकर झाले. निसर्गातील सर्व घटक टिकून राहिले तरच मानवाचे आयुष्य अधिक समृद्ध होणार आहे. मानव लाखो वर्षात कसा राहिला, त्याचे अन्न कोणते, त्याची वस्त्रे कशा प्रकारचे होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरे इतिहासाचे अभ्यासातून मिळतात.
इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते. त्यामुळे आपल्या पूर्वजांविषयी आपल्या मनात स्वाभिमानाची भावना निर्माण होते. पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतात आणि भविष्यात प्रगती करणे शक्य होते.
इतिहासातील कालगणना : भूतकाळात ज्या घटना घडल्या त्या केंवा घडले आहे समजून घ्यावे लागते. घडलेल्या घटना परस्परांशी संबंधित असतात उदाहरणार्थ जेम्स वॅट याने वाफेच्या शक्तीचा शोध लावला. त्यानंतर वाफेवर चालणारी यंत्रे निर्माण झाली. अशा घटनांचा कालवण क्रमानुसार अभ्यास केल्यास त्यांचा परस्परसंबंध लक्षात येतो घटनांचा कार्यक्रम ठरविण्यासाठी काळ मोजण्यासाठी जी पद्धत वापरतात त्याला कालगणना असे म्हणतात.
कालगणना : स्थूलमानाने येशू ख्रिस्तांचा जन्म वर्षापुर्वी इसवी सनाचे कालगणना करतात येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत इसा असे म्हणतात. इसावरून 'इसवी' सा शब्द तयार झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना सोयीचे व्हावे म्हणून इसवी ही कालगणना आज सर्व जगभर वापरली जाते. सन म्हणजे वर्ष किंवा साल.
इसवीसनाच्या सुरुवातीपासून शंभर वर्षांनी एखादी घटना घडल्यास ती कोणते वर्षातील? इसवी सन 100 मधील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 1942 ला भारत छोडो आंदोलन झाले म्हणजेच ही घटना ख्रिस्त जन्मानंतर 1942 वर्षांनी घडली. म्हणून या घटनेचा उल्लेख इसवी सन 1942 मध्ये छोडो भारत आंदोलन झाले असा करतात. ख्रिस्त जन्मानंतर घडलेल्या सर्व घटनांचा काळ या पद्धतीने लिहिला जातो.
इसवीसन सुरू होण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या मग त्यांचा काळ आपण कसा लिहिणार?
वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सनाच्या 599 वर्ष अगोदर झाला म्हणून 'वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये झाला', असे लिहितात. पुढील कालरेषा अभ्यास करूया, म्हणजे कालमापन अधिक चांगले समजेल.
ऐतिहासिक कालगणना करतात अनेक वेळा शतकांचा उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ, भारतात व्यापारासाठी पाश्चात्य व्यापारी इसवीसनाच्या 16 शतकापासून येऊ लागले. महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाज सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. या विधानातील शतक हा शब्द शंभर वर्ष असा अर्थी वापरला आहे.
इसवी सन 1 ते 100 या कालखंडात इसवी सनाचे 'पहिले शतक' म्हणतात भारतात इसवीसन 1901 ते 2000 या काळातील शंभर वर्षांना विसवे शतक असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व पहिले शतक, म्हणजे इसवी सन सुरू होण्यापूर्वीची पहिले शंभर वर्ष. बौद्ध धर्माची स्थापना इसवीसन पूर्व सहाव्या शतकात झाली, म्हणजेच इसवीसनपूर्व 600 ते इसवी सन पूर्व 501 यादरम्यान झाली.
सनाच्या उल्लेखाने नेमक्या वर्षाचा बोध होतो तर शतकाच्या उल्लेखाने ढोबळमनाने त्या शतकाच्या कालखंडाचा बोध होतो.
Comments
Post a Comment