चाचणी

Image
इयत्ता दहावीची भूगोल विषयाची चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇 दहावी विषय भूगोल चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी येथे क्लिक करा👇 7वी भूगोल प्रश्नपत्रिका . . इयत्ता दहावी इतिहासाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी इथे क्लिक करा👇 इतिहास बहुपर्यायी चाचणी (10वी)

इयत्ता 10वी भूगोल (स्थान विस्तार आणि प्राकृतिक रचना व जलप्रणाली) by Juber Sayyad



!!इयत्ता दहावी भूगोल!!

कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

 1) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक...... या नावाने ओळखले जाते .

अ) लक्षद्विप  ब) कन्याकुमारी 

क) इंदिरा पॉइंट  ड) पोर्ट ब्लेयर


2) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट........ प्रकारची आहे.

अ) लष्करी  ब) साम्यवादी 

क) प्रजासत्ताक ड) अध्यक्षीय


3) भारताची जास्तीत जास्त भूसीमा या देशाशी संलग्न आहे.

अ) बांगलादेश  ब) पाकिस्तान  

क) चीन  ड) नेपाळ 


4) भारताची राजधानी........ आहे. 

अ) यानम  ब) नवी दिल्ली 

क) दीव  ड) चंदीगड 

5).........ही ब्राझीलची राजधानी आहे.

अ) बाहिया  ब) ब्राझीलिया 

क) रोराईमा  ड) रोंडोनिया



6) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग........

अ) उच्चभूमी चा आहे  ब) मैदानी आहे 

क) पर्वतीय आहे  ड) विखंडित टेकड्यांचा आहे 


7) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा........

अ) उंच पर्वत आहेत  ब) प्राचीन पठार आहे

क) पश्चिम वाहिनी नद्या आहेत  ड)बर्फाच्छादित डोंगर आहेत


8) ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः .........

अ) अवर्षणग्रस्त आहे  ब) दलदलीचे आहे 

क) मानवी वस्तीत प्रतिकूल आहे  ड) सुपीक आहे


9) ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखा लगत........

अ) त्रिभुज प्रदेश आहे  ब) त्रिभुज प्रदेश नाही

 क) विस्तीर्ण खाड्या आहेत ड) मासेमारी व्यवसाय केला जातो


10) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ..........

अ) मुख्य भागापासून तुटलेल्या भूभागाची बनले आहेत 

ब) प्रवाळबेटे आहेत

क) ज्वालामुखीय बेटे आहेत 

ड) खंडी बेटे आहेत


11) अरवली पर्वताच्या पायथ्याशी........

अ) बुंदेलखंड पठार आहे  ब) मेवाड पठार आहे 

क) माळवा पठार आहे  ड) दख्खनचे पठार आहे


12) भारताचा सर्वाधिक भूभाग

अ) पर्वताने व्यापलेला आहे  ब) मैदानी प्रदेशाने व्यापला आहे क) प्राचीन पठाराने व्यापला आहे  ड) वाळवंटाने व्यापला आहे


13)........ हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे.

अ) अरवली  ब) शिवलिक

क) हिमाद्री  ड) हिमाचल


14)........ हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे.

अ) शिवालिक  ब) हिमाद्री

क) बोरवली  ड) हिमाचल


15) राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला......... म्हणतात.

अ) सहारा वाळवंट ब) कलहारी वाळवंट

क) थरचे वाळवंट  ड) गोबी वाळवंट



प्रश्न 2) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?

2) ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे ?

3) ब्राझील मधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात ?

4) भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?

5) हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या ?

6) गंगा नदीचा उगम कोठे होतो 

7) राजस्थानचा मैदानी प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो?

8) कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते ?

9) हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या ?

10)गुजरात किनारपट्टीवर कोणती आखाते आहेत ?

11)ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो ?

12) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोठे आहे ?


प्रश्न 3 अचूक गट ओळखा.

1) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.

अ) पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी 
ब) गियाना उच्चभूमी - अमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी 
क)किनारपट्टीचा प्रदेश - ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी

2) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.

अ) जुरूका - झिंगु - अरागुआ
ब) निग्रो - ब्रांका - पाखरू
क) जापुआ - जारुआ- पुरुष

3) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात.

अ) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड
ब) छोटा नागपुर-माळवा-मारवाड
क) तेलंगणा-महाराष्ट्र-मारवाड




Comments

Popular posts from this blog

धडा 1: इतिहासाची आवश्यकता

हिंदी व्याकरण by Juber Sayyad / Hindi vyakaran by juber sayyad

हिंदी व्याकरण