चाचणी

Image
इयत्ता दहावीची भूगोल विषयाची चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇 दहावी विषय भूगोल चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी येथे क्लिक करा👇 7वी भूगोल प्रश्नपत्रिका . . इयत्ता दहावी इतिहासाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी इथे क्लिक करा👇 इतिहास बहुपर्यायी चाचणी (10वी)

प्रकरण 1 इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा

प्रकरण-1-   इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा

प्रश्न पहिला : दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1) 'आधुनिक इतिहास लेखनाचा जनक '..........यास म्हणतात.

2) 'आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज 'हा ग्रंथ........... यांनी लिहिला.

3) इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला...........असे म्हणतात.

4) आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ..........इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.

5) 'हिस्टरी 'हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या.......... या ग्रीक इतिहासकारांने प्रथम यांच्या ग्रंथाच्या शिक्षकासाठी वापरला.

6) एकोणिसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने..........यांच्या विचारांचा प्रभाव होता. 

7) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये..........नावाने ओळखल्या जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयास आली.

8) उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सा पूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला.........असे म्हणतात.


ब) : प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा.

1) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल = रिझन इन हिस्टरी 

2) लिओपॉल्ड व्हान रांके = द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी 

3) हिरोडोटस = द हिस्टरी

4) कार्ल मार्क्स = डिस्कोर्स ऑन द मेथड


प्रश्न 2)  संकल्पना चित्र पूर्ण करा.
 *तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 2 ब )थोडक्यात टिपा लिहा.

1)जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल.

2) मायकेल फुको.

प्रश्न 2 ब ) संकल्पना स्पष्ट करा.

1) द्वंद्ववाद .

2) ॲनल्स प्रणाली .

प्रश्न 3 अ) विधाने सकारण स्पष्ट करा.

1) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन झाले .

2) मायकेल फुको यांचे लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे.

3) इतिहास संशोधनात प्रयोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही.

प्रश्न  3 ब ) थोडक्यात (पंचवीस ते तीस )शब्दात उत्तरे लिहा.

1) इतिहास लेखन म्हणजे काय ?

2) रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला  ?

3) वॉल्टेअर यांना 'आधुनिक इतिहास लेखनाचे जनक' असे का म्हटले जाते?

4) इतिहास संशोधनाची उद्दिष्टे लिहा.


प्रश्न 4) पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न

1) कोणत्या पद्धतीच्या आधारे विज्ञानाचे नियम वारंवार सिद्ध करता येतात ?

2) इतिहास लेखनासाठी कोण कोणाचे सहाय्य आवश्यक असते ?

 3) इतिहास लेखनाच्या मर्यादा स्पष्ट करा.

प्रश्न 5 ) पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

 1) कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा.

2) आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती  ?

3) लिओपोल्ड व्हान रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.

प्रश्न 5) चित्राचे निरीक्षण करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा

1) हे चित्र कोणाचे आहे हे ओळखून त्यांनी इतिहासाच्या संदर्भात मांडलेले विचार लिहा.

***






Comments

Popular posts from this blog

धडा 1: इतिहासाची आवश्यकता

हिंदी व्याकरण by Juber Sayyad / Hindi vyakaran by juber sayyad

हिंदी व्याकरण