चाचणी

Image
इयत्ता दहावीची भूगोल विषयाची चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇 दहावी विषय भूगोल चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी येथे क्लिक करा👇 7वी भूगोल प्रश्नपत्रिका . . इयत्ता दहावी इतिहासाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी इथे क्लिक करा👇 इतिहास बहुपर्यायी चाचणी (10वी)

भरती-ओहोटी (विषय भूगोल) 7th


भरती-ओहोटी

1) समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खुप जवळ येते त्यावेळेस किनाऱ्यापासून दूर पर्यंत जाते सागरजलाच्या हालचाली यांना अनुक्रमे भरती व ओहोटी म्हणतात.
2) काही अपवाद वगळता जगभरातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारे नैसर्गिक रित्या भरती-ओहोटी येत असते.

● भरती ओहोटी चे चक्र

1) भरती-ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे.

2) भारती ची कमाल मर्यादा घातल्या नंतर ओहोटीची सुरुवात होते तसेच पूर्णहुटी झाल्यानंतर भरती ची सुरुवात होते.

3) दर बारा तास पंचवीस मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते.

● भरती-ओटीमागील शास्त्र :

1)भरती-ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी घटना आहे.

2) ही घटना सहज व स्वाभाविक वाटते; परंतु या घटनेचा संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो.


●केंद्रोत्सारी बल ;

1) परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते.

2) ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्र सारी प्रयत्न म्हणतात.

● गुरुत्वीय बल

1) पृथ्वीवरील कोणतीही वस्तू केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते; परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करीत असते.
2) हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असते त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते.

● भरती ओहोटी चे कारणे

सागरजलाची हालचाल होऊन विविध ठिकाणी सागराला भरती ओहोटी येते यासाठी पुढील घटक कारणीभूत ठरतात.
1) चंद्र,सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल.

2) पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे.

3) यामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा.

● चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल यांची परिणामकारकता:

सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ आहे त्यामुळे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याचे गुरुत्वाकर्षण बला पेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते.


!!प्रश्नोत्तरे!!

प्रश्न 1) योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :

1) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण.......... आहे.

 (उष्णता, वारा, खोली)

2) भरतीच्या पाण्याचा......... व्यवसाय फायदा होतो.

( मासेमारी,शेती,खाणकाम)

3) लाटेच्या उंच भागाला.......... म्हणतात.                

(द्रोणी, शीर्ष ,लांबी)

प्रश्न 2) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1)लाटांची गती कशावर अवलंबून असते?

2) भरती-ओहोटीची दोन मुख्य प्रकार कोणते?

3) उधाणाची भरती ओहोटी केव्हा येते?

4)भंगाची भरती ओहोटी केव्हा येते?

5) पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबान वापरावे लागतात ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात?

प्रश्न 3) पुढील संज्ञा स्पष्ट करा.

1)शीर्ष 

2)द्रोनी 

3)त्सुनामी 

प्रश्न 4 )पुढील बाबींचा भरती ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.

1)पोहणे

2) जहाज चालवणे

3)मासेमारी

4)मीठ निर्मिती

5) सागरी किनारी सहलीला जाणे.

प्रश्न 5 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

1) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळी कोणत्या ते लिहा.

2) ज्यावेळी मुंबई (73°पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल, त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण सांगा.

3) लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा.

4)लाटा निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

5) लाटेची उंची व लांबी कशाप्रकारे सांगता येते?

6) लाटांचे परिणाम स्पष्ट करा.

प्रश्न 6) पुढील विधानांची भौगोलिक कारणे स्पष्ट करा.

1)भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

2) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दनिता बनतो.

3) ओहोटीच्या ठिकाणाची विरुद्ध
रेखावृत्तदेखील अहोटीच येते.

4)सागरी लाटा उठत किनारी भागात येऊन फुटतात.














Comments

Popular posts from this blog

धडा 1: इतिहासाची आवश्यकता

हिंदी व्याकरण by Juber Sayyad / Hindi vyakaran by juber sayyad

हिंदी व्याकरण